8 Th Pay Commission | नुकतेच लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झालेला आहे. यावर्षी बहुमताने भाजप सरकार आघाडीवर आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार आहे. मोदी सरकार हे पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नेमले जाणार आहेत. त्यामुळे आता नव्या सरकारकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे आता केंद्रीय सरकार कर्मचाऱ्यांवर खुश होईल, असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नवे सरकार आल्यावर आता आठवा वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू होऊ शकते. परंतु या संबंधित कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही. पुढील वर्षापर्यंत मोदी सरकार मोठी घोषणा करू शकते. अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पुढील वेतन आयोगाची तयारी | 8 Th Pay Commission
केंद्र सरकार पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करू शकतात, अशी माहिती आलेली आहे. आतापर्यंत आठवा वेतन आयोग येणार नाही, अशी चर्चा होती. परंतु पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू होईल. अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारने याबाबत अजून कोणतेही विधान केलेले नाही. परंतु या नव्या चर्चांना आता उधान आलेले आहे. पावसाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पगारात होणार वाढ
सरकारने जर आठवा वेतन आयोग लागू केला, तर पगारात मोठी वाढ होऊ शकते. याबाबतचे नियोजन आयोग देखील स्थापन होणार आहे. आणि असं मंत्रालयाला ही जबाबदारी जाणार आहे, अशी चर्चा चालू आहे. त्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत निर्णय घेऊ शकतात.
किती पगार वाढ होणार ?
सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगाचे सगळं काही सुरक्षित झाले, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात खूप मोठी वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 44.44% वाढ होऊ शकते.