संतापजनक ! 8 वर्षीय गतिमंद मुलीवर 42 वर्षीय नराधमाने केले अत्याचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात आहेत. यामध्ये रामबाग परिसरात 42 वर्षीय नराधमाने एका 8 वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्या 42 वर्षीय आरोपी नराधमाला अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत रामबाग परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीवर तिच्याच घराच्या पाठीमागे राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपी नराधमाने दुपारच्या सुमारास लैंगिक अत्याचार केले. सुरज लोखंडे असे या आरोपी नराधमाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी हि पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असून तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी सुरज लोखंडे हा एकटाच राहत असून त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तर त्याचा मुलगासुद्धा तुरुंगात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment