हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | साप किंवा अजगर लांबून जरी बघितलं तर भल्याभल्यांना जागीच घाम फुटतो. पण जर कुणी तुम्हांला सांगितलं की, एका ८ वर्षीय मुलीचा ‘बेस्ट फ्रेन्ड’ अजगर आहे तर खरंच तुमचा विश्वास बसणार नाही परंतु इस्त्राइलमधील एका मुलीचा स्वीमिंग बडी अजगर आहे. जेव्हा तिच्या घराच्या बॅकयार्डातील स्वीमिंग पूलमध्ये उतरते तेव्हा तिचा पाळीव अजगरही तिच्यासोबत असतो. या अजगराचा आकार पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. सामान्यपणे लहान मुले साध्या पालीला बघूनही घाबरतात, पण ही मुलगी ११ फूट लांब अजगरासोबत खेळते.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इनबर असं या मुलीचं नाव असून ती तिच्या पालकांसोबत साऊथ इस्त्राइलमध्ये एका एनीमल सॅंक्युरीमध्ये राहते. ती बालपणापासूनच प्राण्यांसोबत राहते, त्यांच्यासोबतच ती वाढली आहे. बेले नावाचा अजगर त्याच पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा इनबरने बेलेसोबतच सर्वात जास्त वेळ घालवला. दोघांची पक्की मैत्री झाली.
An eight-year-old Israeli girl’s favorite swimming buddy is her 11-foot yellow pet python called Belle https://t.co/XEsjdPQGam pic.twitter.com/V2IUna7T2F
— Reuters (@Reuters) October 8, 2020
इनबरला सापांसोबत फिरणं आणि खेळणं आवडतं. कधी-कधी ती सापाची कात काढण्यात आणि कोरोना दरम्यान आनंदी राहण्यात त्यांची मदत करते. इनबरची आई Sarit Regev ने सांगितले की, ‘इनबर अनेक साप आणि इतरही प्राण्यांमध्ये मोठी झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’