हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या युगात लोकांची फसवणूक मोठ्याप्रमाणात वाढली असून , यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सायबर गुन्ह्याला रोखण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. यासाठीच भारत सरकारने देशातील बनावटी सिम कार्ड्स विरोधात मोठी कारवाई केली असून , आता लाखांहून अधिक बनावट सिम कार्ड्स बंद केले गेले आहेत . तसेच हि बनावटी सिम कार्ड ओळखण्यासाठी टेलिकॉम विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला आहे . त्याच्या माध्यमातून बनावटी सिम कार्ड ओळखण्यास मोठी मदत मिळाली आहे. या महत्वाच्या पाऊलामुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसणार आहे.
तब्बल 80 लाखांहून बनावट सिम कार्ड्स बंद –
सरकारने आतापर्यंत तब्बल 80 लाखांहून अधिक बनावट सिम कार्ड्स बंद केले आहेत. या सिम कार्ड्ससाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता आणि याच्याच माध्यमातून अनेकजणांची फसवणूक केली जात होती. हे समजल्यानंतर सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी या सर्वाचा शोध घेण्यासाठी AI चा वापर केला आहे. त्यामुळे फसवणुकीला आळा घातला गेला आहे.
6.78 लाख मोबाईल नंबरही बंद –
बनावट सिम कार्ड्सशिवाय, सरकारने 6.78 लाख मोबाईल नंबरही बंद केले आहेत, जे सायबर गुन्ह्यांमध्ये वापरले जात होते. हा उपाय सरकारच्या डिजिटल सुरक्षेला बळकटी देण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग आहे. तसेच टेलीकॉम विभागाने AI च्या साहाय्याने बनावट कागदपत्रांवर आधारित 78.33 लाख मोबाईल नंबर शोधून त्यांना बंद केले. सरकारच्या या मोठ्या पावलामुळे डिजिटल सुरक्षेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवता येईल.
AI च्या मदतीने टेंशन कमी –
वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे अनेक लोक चिंतेत होते. पण आता सरकारच्या कल्पना आणि AI च्या मदतीने हि चिंता कमी झाली आहे. सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.