राज्यात आत्तापर्यंत ८१९ पोलीस कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू – गृहमंत्री अनिल देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करुन आत्तापर्यंत ४ कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

त्याचवेळी लॉकडाउनच्या काळात पोलिसांवर झालेल्या २१२ हल्ल्यांच्या घटनांमध्ये आतापर्यत ७५० जणांवर कारवाई करत अटक करण्यात आली आहे. तसेच लॉकडाउनच्या काळात अवैध वाहतुकीच्या १२९१ प्रकरणांची या काळात नोंद केली असल्याचेही देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं. सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ७९२ जण क्वारंटाइन आहेत. त्यापैकी ६६२ जणांनी क्वारंटाइनच्या नियमांचा भंग केला आहे अशीही माहिती देशमुख यांनी दिली आहे.

तसेच राज्य सरकारने ४ हजार १९ मदत केंद्र करोना रुग्णांसाठी उभी केली आहेत. या केंद्रांमध्ये ३ लाख ८८ हजार ९४४ स्थलांतरित मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे असंही देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment