PEN International 2018 | भारतात भरणार ८४ वी पेन इंटरनॅशनल काँग्रेस

0
48
PEN International Pune
PEN International Pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | जगभरातील विख्यात साहित्यिकांची पेन इंटरनॅशनल यंदा पुण्यात भरणार आहे. ८४ व्या पेन इंटरनॅशनल मधे देश विदेशातील साहित्यिक सहभागी होणार असून ” माझे सत्याचे प्रयोग” असे या इंटरनेशनलचे कॅप्शन असणार आहे. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त हा मान यावर्षी भारताला मिळाला आहे. गांधीजींनी सांगीतलेली “सत्य आणि अहिंसा” ही मुल्य पेन इंटरनॅशनलसाठी मुख्य थीम म्हणुन निवडण्यात आली आहेत. तर सांस्कृतिक आणि भाषिक विविधता यावरही परिषदेचा भर असणार आहे.

२५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान भरणार्या या काँग्रेसमधे १४० हून अधिक देशातील पेन प्रतिनिधी सहभागी होणार अाहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणारी दक्षिणायन ही चळवळ यावेळी पेन काँग्रेसमधे सहभागी होणार आहे. तसेच सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेने संपन्न असण्यार्या भारतातील एकूण ७८० हून अधिक भाषांना पेन काँग्रेसमधे प्रतिनिधित्व मिळणार आहे. चित्रकार गुलाम शेख, अशोक वाजपेयी, केनियन लेखक एन गुगी, आशिष नंदी आदी मान्यवर यामधे सहभागी होणार आहेत. पेन काँग्रेसनिमित्त जागतिक भाषावारीचे आयोजन करण्यात आले असून ही वारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पुणे विद्यापीठ गेट पासून बालगंधर्व रंगमंदीरपर्यंत असणार आहे. जगातील एकुन सहा हजार भाषांचे प्रतिनिधित्व मराठी भाषा करणार आहे.

पेन इंटरनेशनल ही जगभरातील साहित्यिकांची संघटना असून तिची स्थापना १९२१ साली लंडन येथे झाली होती. PEN या शब्दाची फोड “Poets, Essayists, Novelists” अशी असून देश विदेशातील साहित्यिकांमधे मैत्री प्रस्थापित करणे आणि त्यांच्यात बौद्धिक सहयोगाची भावना निर्मान करणे ही पेन इंटरनेशनलची मुख्य उदिष्टे आहेत. मागील वर्षीची पेन इंटरनॅशनल युक्रेन येथे झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here