दिवस दिलासादायक : सातारा जिल्ह्यात नवे 863 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 299 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 863 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 299 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 569 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7.64 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 947 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 9 हजार 893 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 96 हजार 928 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 54 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 11 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

आठवडाभरातील सर्वाेच्च कोरोनामुक्त काल दिवसभरात झालेले आहेत. तर बाधितांचा आकडा स्थिर असल्याचे दिसून आले. मृत्यूचाही दिवसभरातील संख्या कमी आलेली आहे. त्यामुळे कालचा दिवस सातारा जिल्ह्यासाठी दिलासादायक असा ठरला आहे.

Leave a Comment