8th Pay Commission : 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? सरकारने दिली महत्वाची माहिती

8th Pay Commission
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 8th Pay Commission । ८ व्या वेतन आयोग कधी लागू होतोय याची वाट केंद्रीय कर्मचारी आतुरतेने बी बघत आहे. आता हा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याबाबत सरकार कडून महत्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. आठव्या वेतन आयोगासाठी अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती होताच ते अधिसूचित केले जाईल अशी माहिती सरकार कडून करण्यात आली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे.

खरं तर, आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) अधिसूचना अद्याप जारी केलेली नाही. कारण, अर्थ मंत्रालयाने अद्याप संदर्भ अटी (टीओआर) अंतिम केलेल्या नाहीत, ज्या १ कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शनच्या सुधारणेसाठी आधार बनतील. कालपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झालं. पहिल्याच दिवशी खासदार टीआर बाळू आणि आनंद भदोरिया यांनी ८ व्या वेतन आयोगाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. सरकारने जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या आठव्या वेतन आयोगाची अधिसूचना केली आहे का?? असा सवाल दोन्ही खासदारांनी सरकारला केला.

यावर उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले, “सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग (CPC) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि राज्यांसह प्रमुख भागधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर, त्याची अधिसूचना जारी केली जाईल. जेव्हा आयोग त्यांच्या शिफारस देईल आणि सरकार त्या स्वीकारतील त्यानंतरच आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार हे ठरवले जाणार आहे असेही पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं. 8th Pay Commission

का होतोय उशीर ? 8th Pay Commission

खरं तर केंद्र सरकारने जानेवारीमध्येच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती, परंतु आतापर्यंत त्याचे अध्यक्ष, सदस्य किंवा कार्यकाळ याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आयोगाच्या स्थापनेपासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला बराच वेळ लागतो. सुमारे १.१२ कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये ७ व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच हा आयोग सुरू होईल असं बोललं जातेय.