8th Pay Commission | आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर पगारात किती वाढ होणार?; जाणून घ्या अपडेट

8th Pay Commission
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या सातव्या वेतन आयोगानुसार काम करत आहे. आणि गेल्या अनेक काळापासून हे कर्मचारी अशा वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ते सह त्यांना इतर भत्ते दिले जातात. आठवा वेतन आयोग लागू केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची मागणी केलेली आहे. सरकारकडून आता त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेले आहेत.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार | 8th Pay Commission

हाती आलेल्या माहितीनुसार आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. आणि पहिला वेतन आयोग हा 1946 मध्ये लागू झालेला. त्यामुळे आठवा वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांना आणखी दोन वर्षे वाट बघण्याची आवश्यकता आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यास जवळपास 49 लाख सरकारी कर्मचारी त्याचप्रमाणे 68 लाख पेन्शनधारकांना देखील याचा फायदा होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधन देखील वाढवले जाईल. त्याचप्रमाणे फिटमेंट घटक वर्तमान मूल्याच्या 3.67% केली जाईल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल, तर यामुळे मूळ वेतनात 8000 ते 26 हजार रुपयांनी वाढ होऊ शकते.

आठव्या वेतन आयोगात कोणकोणते लाभ अपेक्षित

आठवा वेतन आयोग लागू झाल्यास अनेक फायदे देखील अपेक्षित आहे. त्यामध्ये वेतनश्रेणी सुधारणा आणि उत्तम सेवा निवृत्ती लाभांचा ही समावेश असेल. यामुळे पेन्शनधारकांना आणि लष्करी कर्मचाऱ्यांना देखील लाभ होणार आहे.