व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

स्मार्ट सिटीचा उपक्रम; शहरातील 9 स्मशानभूमी करणार नयनरम्य

औरंगाबाद – महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये स्मशानभूमीकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये सर्वसामान्यांना दहा मिनिटे थांबू वाटत नाही. अनेक नागरिक तर स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर उभे राहतात. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील नऊ स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. संचालक मंडळाचा होकार आल्यानंतर अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याचे काम सुरू होणार आहे.

शहर चारही दिशेने वाढत आहे. लोकसंख्याही वाढू लागली. त्यातुलनेत स्मशानभूमी कबरस्तान ची संख्या वाढविण्यात आली नाही. अनेक वसाहतींना या सुविधा नसल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. शहरात 41 स्मशानभूमी तर लहान-मोठे 42 कबरस्थान आहेत. प्रत्येक झोनमधील एक मोठी स्मशानभूमी स्मार्ट करण्याची संकल्पना स्मार्ट सिटीने मांडली यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती सीईओ अस्तिककुमार पांडेय यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 5 स्मशानभूमी विकसित करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 4 स्मशानभूमीचे काम हाती घेतले जाईल.