ट्रक व युको कारच्या भीषण अपघातात 9 ठार

truck and UCO car Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड | माणगाव तालुक्यातील रेपोली गावच्या हद्दीत ट्रक व इको कार यांची भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. सदरचा अपघात एवढा भीषण होता की या अघातामध्ये 9 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. तर एक चार वर्षाचा चिमुरडा गंभीर जखमी आहे. अपघातातील मृतांमध्ये 4 महिलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले प्रवासी रत्नागिरी – गुहागर येथील रहिवाशी आहेत.अपघाता मधली इको कार क्रमांक (एमएच- 04- बीटी- 8673) ही मुंबईहून गोव्याच्या दिशेने गुहागर कडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. अपघाता स्थळी लोणेरे व माणगाव पोलीस दाखल झाले असून जखमीना व मृत्युमुखी पडलेल्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालया येथे पाठविण्यात आले आहे.

या अपघातामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. तसेच इको गाडीचा चक्काचूर झालेला आहे. पोलिस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परंतु या अपघातामुळे लोकांची मोठी पळापळ उडाली.