रेल्वेतील अंडा बिर्याणी बेतली जीवावर; तब्बल 90 प्रवाशांना झाली विषबाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रेल्वेने (Indian Railway) प्रवास करताना चांगले जेवण मिळत नाही, अशी तक्रार अनेकवेळा प्रवाशांकडून करण्यात येत असते. धक्कादायक बाब म्हणजे, आता याच जेवनामुळे 90 प्रवाशांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याचा प्रकार घडला आहे. या सर्व प्रवाशांनी रेल्वेच्या जनआहार स्टॉलवरील अंडा बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतरच एकेक करत 90 प्रवाशांना मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. यामुळे रेल्वेतील 90 प्रवाशांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले. आता या सर्व प्रवाशांवर इटारसी, कानपूर, झाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी यशवंतपूर एक्स्प्रेस गोरखपूरच्या दिशेने निघाली होती. प्रवासावेळीच बल्लारशाह रेल्वे स्थानकावरुन जन आहार स्टॉलमधून अंडा बिर्याणीची 200 पार्सल घेण्यात आली. यातील काही पार्सल नागपूर रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. नंतर प्रवाशांच्या मागणीनुसार बल्लारशाह, नागपूर, इटारसीमध्ये वेगवेगळ्या प्रवाशांना अंडा बिर्याणी देण्यात आली. परंतु ही अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतरच तीन ते चार तासांनी गाडी इटारसीजवळ पोचली असताना प्रशाला अस्वस्थ वाटू लागले. तसेच त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला.

प्रवाशांना होणारा हा त्रास पाहता इतर कोचमधील प्रवाशांची देखील पाहणी करण्यात आली. यानंतर अंडा बिर्याणी खाल्लेल्या सर्वच प्रवाशांना हा त्रास होत असल्याची बाब लक्षात आली. पुढे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून ताबडतोब कानपूर रेल्वे स्थानकावरील डॉक्टरांचे पथक ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांवर उपचार करण्यास सुरुवात केले. तसेच ज्या रुग्णांची प्रकृती खूपच बिघडली आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अंडा बिर्याणी खाल्ल्यामुळेच या सर्व प्रवाशांना विषबाधा झाली असल्याची माहिती डॉक्टर आणि रेल्वे प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन पोलिसांच्या मदतीने घडलेल्या प्रकाराचा तपास करीत आहेत.