धक्कादायक ! मुलाच्या दारुच्या बाटलीने घेतला 90 वर्षीय वृद्धाचा जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – आपली मुले वाईट मार्गाला लागू नये त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन लागू नये म्हणून आई वडील आयुष्यभर प्रयत्न करत असतात. तसेच वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाची परत त्यापासून सुटका करण्यासाठी अनेक आईवडील आपल्या जीवाचे रान करतात. पण कधी कधी आई वडिलांचा हा प्रयत्न त्यांच्याच जीवावर बेतू शकतो. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पाटोदा याठिकाणी घडली आहे. यामध्ये मुलाकडील दारुची बाटली काढून घेत असताना, मुलाने ढकलून दिल्यामुळे 90 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
आरोपीचे नाव माधव कोल्हेकर आहे. त्याला दारूचे खूप व्यसन होते. बऱ्याच वर्षांपासून त्याला दारूचे व्यसन होते. या दारूच्या व्यसनामुळे बऱ्याचदा घरात भांडणेसुद्धा झाली आहेत. यामुळे आपल्या मुलाने दारू पिऊ नये म्हणून 90 वर्षीय वडील दौलता अमृता कोल्हेकर हे नेहमी प्रयत्न करत होते. पण मुलगा माधव कोल्हेकर याचे दारूचे व्यसन काही केल्या सुटत नव्हते.

13 मे रोजी सकाळी 11 वाजता मुलगा माधव कोल्हेकर दारुची बाटली घेऊन घरी आला. तेव्हा वडील दौलता अमृता कोल्हेकर यांनी मुलाला दारू पिण्यापासून रोखले. तसेच त्यांनी त्याच्या हातातील दारुची बाटली काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी मुलाने वडिलांना ढकलून दिले. वडिलांना ढकलल्यानंतर त्यांचा तोल जाऊन त्यांचे डोके घरातील गॅस सिलिंडरच्या टाकीवर जाऊन आदळले व त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्येच त्यांचा जीव गेला. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी पंचनामा करून आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment