Tuesday, June 6, 2023

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, यावर्षी नोव्हेंबरपर्यंत एकूण मदतीची रक्कम ही एक लाख कोटींपेक्षा जास्त होईल. कारण पैसे पाठविण्याचे काम अजूनही चालू आहे. विशेष गोष्ट अशी आहे की, कोणताही शेतकरी कोणत्याही वेळी यासाठी नोंदणी करू शकतो आणि लाभ घेऊ शकतो. त्याअंतर्गत वर्षाकाठी 6000 रुपयांची मदत दिली जाते.

गेल्या दीड महिन्यांत 8.80 कोटी लोकांना 2-2 हजार रुपये पाठविण्यात आले आहेत. कोरोना संक्रमणकाळातही या योजनेची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बरीच कामे केली गेली. हे सर्व पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) मार्फत पाठविले जात आहेत, जेणेकरुन भ्रष्टाचारी राजकारणी आणि नोकरशहा यांची यावर नजर पडणार नाही. देशातील सर्व 14.5 कोटी शेतकरी कुटुंबांना पैसे देण्यात येणार आहेत, मात्र या योजनेत अजूनही सर्व लोकांचे व्हेरीफिकेशन झालेले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केली आणि त्यांच्यावरील दबाव कमी केला.

अशा प्रकारे अधिकाधिक लोकांना लाभ मिळू शकेल
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कुटुंबातील व्याख्या म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले आहे. महसूल रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेली कोणतीही प्रौढ व्यक्ती स्वतंत्रपणे याचा लाभ घेऊ शकते. याचाच अर्थ असा की, जर एकापेक्षा जास्त प्रौढ सदस्यांची नावे समान शेतीच्या जमीनीच्या कागदपत्रात नोंदविली गेली असतील तर तो प्रत्येक प्रौढ सदस्य या योजनेअंतर्गत स्वतंत्र फायद्यासाठी पात्र ठरू शकतो. जरी तो संयुक्त कुटुंबात राहत असेल. यासाठी महसूल नोंदी व्यतिरिक्त आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक आवश्यक असेल.

या प्रकारे स्वतः अर्ज करा
या योजनेंतर्गत आपण घरबसल्या ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकता. तसेच आपण आपल्या अर्जाची सध्याची स्थिती जाणून घेऊ इच्छित असल्यास किंवा त्यामध्ये काही बदल करू इच्छित असल्यास आपण ते फक्त क्लिकवर करू शकता.

यासाठी पहिले www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या पहिल्या पेजवर, उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर असे मोठ्या अक्षरात लिहिलेले असेल. आपले नाव या लिस्टमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / लाभार्थी लिस्टवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.

आपण या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्यासंबंधी स्थिती जाणून घेऊ इच्छित असल्यास Beneficiary status वर क्लिक करा. यानंतर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर टाकून आपण सद्यस्थिती जाणून घेऊ शकता. पीएम-किसानच्या 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करूनही आपल्या अर्जाची स्थिती देखील जाणून घेऊ शकता. या क्रमांकावर कॉल करून आपण अर्ज करूनही पैसे का उपलब्ध नाहीत हे देखील शोधू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.