बारा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; खेळताना पडला होता डोहात

0
30
River Death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | चिकलठाणा येथील हिनानगर भागातील 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली आहे. आदिल शेख रहीम शेख, वय 12 (रा. नगर चिकलठाणा) असे मृत बालकाचे नाव आहे.

हिनानगर येथील काही मुले केंब्रिज सावंगी बायपास रोडच्या बाजूच्या ओढ्यात शनिवारी दुपारी खेळण्यासाठी गेली होती. खेळता-खेळता आदिल शेख सहा फूट खोल डोहात बुडाला. तेव्हा सोबतच्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली काही वेळातच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. आदिल डोहात बुडाला असल्यामुळे बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला बोलविण्यात आले होते. या पथकाने मृतदेह बाहेर काढला एमआयडीसी सिडको पोलिसांनी घाटी रुग्णालयात पाठवला डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आदीलनंतर त्याला पाच भाऊ बहिन आई वडील असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here