औरंगाबाद : औरंगाबाद-हर्सूल सावंगी तलावा जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला ३४ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रशांत केशवराव पालोदकर (वय ३४ रा.पानवडोद ता.सिलोड जि. औरंगाबाद ) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून, प्रशांत हे शेती काम करत होते. परंतु गेल्या सहा सात महिन्यापासून त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालय येथे उपचार सुरू होते. त्याचवेळी बुधवारी १६ रोजी गावकऱ्यांना एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तात्काळ हर्सूल पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रशांत यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रशांत याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहे. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हर्सूल पोलिस करत आहे.