सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर मंगळवारी पर्यटकासह स्थानिक नागरिकांना अस्वलाचे दर्शन झाले. अनेक वन्य प्राण्यांचा या भागात अधिवास असलेला दिसून आला आहे. मात्र अस्वलाचे प्रथमच या भागात दर्शन झाले असल्याने पर्यटकांसह नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या एप्रिल महिना असल्याने शनिवार-रविवार तसेच इतर दिवशी पर्यटक सुट्टीत सातारा जिल्ह्यातील कास पठारावर पर्यटनासाठी येत आहेत. या ठिकाणी असलेल्या निर्सगाचा ते आनंद घेत असून त्यांआई अनेक प्राणी पहायला मिळत आहेत. दरम्यान, मंगळवारी एक पर्यटक कास पठारावर फिरण्यासाठी आला असता. त्याला अस्वल फिरत असल्याचे दिसून आले.
साताऱ्याच्या कास पुष्प पठारावर अस्वलाचे दर्शन… pic.twitter.com/uLbhi7gWRL
— santosh gurav (@santosh29590931) April 11, 2023
यावेळी त्याने लांबून आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात अस्वलाचा मुक्त संचार करतानाचा व्हिडीओ चित्रित केला. कास पठारावर अस्वल येण्याची हि पहिलीच घटना असून अस्वलाच्या दिसण्यामुळे पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अस्वलाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.