हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 7 जुलै 2024 रोजी NEET PG 2024 परीक्षा होणार आहे. याबाबतची अधीकृत घोषणा मंगळवारी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती उमेदवारांना NBEच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. मधल्या काळामध्ये नीट एक्झाम पुढे ढकलली जाणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. मात्र आता NBE ने अधिकृत घोषणा करत ही एक्झाम 7 जुलै रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
यापूर्वी NEET PG 2024 Exam परीक्षा तीन मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु पुन्हा ही तारीख बदलत नवीन तारीख 7 जुलाई 2024 अशी निश्चित करण्यात आली आहे. या मधल्या काळात परीक्षेसंदर्भात अनेक अफवा पसरल्यामुळे प्रशासनासहित विद्यार्थ्यांचा देखील गोंधळ उडाला होता. अखेर आज या परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. NBE ने आज नीट परीक्षा सात जुलै 2024 रोजी होणार असल्याचे घोषित केले आहे.
त्याचबरोबर, NEET PG 2024 Exam साठी पात्रतेची कट ऑफ तारीख 15 ऑगस्ट 2024 अशी असणार आहे. यासाठी उमेदवारांनी NBE ची अधिकृत वेबसाईट सतत तपासत राहावी असे आवाहन NBE ने केले आहे. त्यामुळे आता उमेदवारांना अभ्यासाकडे लक्ष देत येणाऱ्या सूचना देखील तपासाव्या लागणार आहेत.