एका बिस्किटामुळे बदलले महिलेचे आयुष्य, गमावली होती नोकरी; आता आहे कोट्यावधीची मालकीण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यात काय करावे हे माहित नसते,मात्र आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना संकेत म्हणून येतात. ज्याला ते समजते, त्याच्या जीवनाला दिशा मिळते. Amanda नावाच्या एका महिलेच्या बाबतीतही असेच घडले. तिच्या आयुष्यात अशी वेळ आली की, तिला आता पुढे काय करावे हे समजत नव्हते तेव्हा एका बिस्किटाने (Fortune Cookies) तिला मार्ग दाखवला.

तिची स्टोरी @someonefromthe80s नावाच्या TikTok अकाउंटद्वारे शेअर करताना Amanda ने सांगितले की,” Fortune Cookies ने तिच्या आयुष्याला दिशा दिली आणि आता ती कोट्यधीश झाली आहे. जेव्हा तिला एका सुंदर मेसेज सह या Cookies मिळाल्या, तेव्हा तिचे आयुष्य एका वेगळ्याच वळणावर होते. नोकरी गेली आणि आता पुढे काय करावे हे तिला समजू शकले नाही? मात्र या Cookies हातात आल्यानंतर त्या महिलेला तिचा जगण्याचा मार्ग सापडला.

खुश करण्यासाठी पतीने गिफ्ट केल्या Cookies
दोन मुलांची आई असलेली Amanda सांगते की, तिने पाच वर्षांपूर्वी नोकरी गमावली होती आणि आतून खूप तुटलेली होती. दरम्यान, तिच्या पतीने तिला खुश करण्यासाठी Cookies चे पॅकेट दिले. जेव्हा 30 वर्षीय Amanda ने या Cookies उघडल्या, तेव्हा तिचे आयुष्यच बदलले. खरं तर, त्या Fortune Cookies सोबत एक चिठ्ठी लिहिली गेली होती – “तू तुझ्या व्यवसायात कमालीची आनंदी राहणार आहेस.” काही लकी नंबर्ससह, ज्या व्यवसायांमध्ये ती यशस्वी होऊ शकते त्याची नावेही या चिठ्ठीमध्ये लिहिली होती.

एका कल्पनेने Amanda चे आयुष्य बदलले
हा मेसेज पाहिल्यानंतरच Amanda ने ETSY shop उघडले आणि तिला त्यात अभूतपूर्व यश मिळाले. Amanda चे कस्टम मेड बॅनर व्हायरल झाले आणि तिला त्याचा खूप फायदा झाला. Amanda रातोरात करोडपती बनली आणि आता तिची कंपनी 12 मिलियन डिलर्सची झाली आहे. Amanda ने ही गोष्ट TikTok वर शेअर केली आणि लोकांनाही ती खूप आवडली. Amanda म्हणते की,”आत्मविश्वासाने केलेले प्रत्येक काम यश देते.”

Leave a Comment