रोटी देण्याच्या कारणावरून हाॅटेलमध्ये बियरची बाटली फोडली डोक्यात

Malkapur Nagerpanchyt Karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | हॉटेलमध्ये अगोदर रोटी देण्याच्या कारणावरून बियरची बाटली डोक्यात फोडून एकाला जखमी केले. मलकापूर तालुका कराड गावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित सूर्यकांत पाटील (वय- 27, रा. मलकापूर, ता. कराड) असे जखमीचे नाव आहे. तर संकेत मिठारे व सोन्या मुल्ला तसेच अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अमित पाटील हा रविवारी रात्री मित्रांसमवेत मलकापूर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण करत असतानाच त्यांच्या बाजूच्या टेबलवरती अनोळखी पाचजण जेवणासाठी येऊन बसले. त्यावेळी अमित पाटील व मित्रांनी वेटरला रोटी आणण्यासाठी सांगितले. वेटर रोटी घेऊन आला व अमित पाटील यांच्या टेबल वरती देऊ लागला. त्यावेळी बाजूला बसलेल्या अनोळखी पान जणांपैकी एकाने मला रोटी दे असे वेटरला सांगितले. त्यावेळी अमित पाटील यांनी वेटरला मी अगोदर रोटी सांगितली आहे. मला अगोदर दे असे वेटरला सांगितले.

त्याचवेळी सदरील इसमानी माझी रोटी आहे, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच शिव्या देत त्या अनोळखी पाच जणांनी अमित पाटील यांच्या टेबल जवळ जाऊन त्यांना धक्काबुक्की शिवीगाळ करत टेबल वरील बियरची बाटली उचलून अमित पाटील यांच्या डोक्यात, मानेवर उजव्या हातावर मारली. यामुळे पाटील यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. मित्रांनी भांडण सोडवून पाटील यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात हलवले. याबाबतची फिर्याद अमित पाटील यांनी शहर पोलिसात दिली असून संकेत मिठारे व सोन्या मुल्ला यांच्यावर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस करत आहेत.