कराडजवळ भरधाव कारची टॅंकरला धडक, एक ठार 5 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कोल्हापूरकडून भरधाव वेगाने पुण्याकडे निघालेल्या कारची टॅंकरला पाठीमागून जोराची धडक बसल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. जखिणवाडी फाटा ता. कराड येथे झालेल्या अपघातात कारमधील शकील जमाल शेख (वय -42 रा.स्कायसिटी, धानोर, पुणे) हे जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हरिहर सुथन शिवकुमार (वय -27 रा. नागापट्टीनम, तामीळनाडू) हा कंटेनर घेऊन पुण्याकडे निघाला होता. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास कंटेनर कराडच्या हद्दीत जखिणवाडी फाट्याजवळ आल्यावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ह्युंडाई कारने कंटेनरला जोराची धडक दिली. या धडकेत कारमधील शकिल जमाल शेख हे जागीच ठार झाले.

तर कारमधील रेश्मा शकील शेख (वय- 41), सफा कागलकर(वय -11), सबा कागलकर (वय -12), मेहर कागलकर, मोहंमद कागलकर( 2) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची नोंद कराड शहर पोलिसात झाली असून पोलीस उपनिरिक्षक बी. एस. कांबळे तपास करत आहेत.

Leave a Comment