सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरातील वाय. सी. कॉलेज परिसरामध्ये युवकांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या युवकांच्या हाणामारीत दगडफेक झाल्याने लेडीज शॉपीचे मोठे अर्थिक नुकसान झाले. दरम्यान या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी सोनाली संतोष पवार (रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, सातारा) यांनि तक्रार दिली असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी यश जांभळे (पूर्ण नाव नाही. रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यासह अनोळखी १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. युवकांच्या या राड्यामध्ये लेडिज शाँपीचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला असून हवालदार पोळ तपास करीत आहेत.