औरंगाबादजवळ पुर्ण मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद येथील दौलताबाद रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा रॅक घसरण्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नांदेड- मुंबई रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झालेली आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी किमान दुपारी 12 ते 1 वाजेल असा प्राथमिक अंदाज आहे.

दौलताबाद रेल्वेस्टेशनजवळ रेल्वे मालगाडी रॅक घसरली. यात एका रुळावरून थेट दुसऱ्या रुळावर अशा अवस्थेत हे रॅक घसरले. त्यामुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद पडली. मालगाडी असल्याने यामध्ये कुठलीही जिवितहानी झालेली नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली हे मात्र अजून समोर आलेली नाही. यामुळे परभणी ते मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून, वाहतूक पुर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Leave a Comment