वारूंजीत घुसीच्या पिंजऱ्यात सापडला वेगळाच प्राणी, वनविभागाने घेतला ताबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | वारुंजी फाटा येथे माजी प्राचार्य गुलाबराव रामचंद्र पाटील (तांबवेकर) यांच्या घरात घुशीसाठी लावलेल्या पिंजऱ्यात उद मांजर (इंडियन स्मॉल सिव्हेट) फसल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पाटील कुटुंबियांनी यांनी तात्काळ मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर व घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सदर उदमांजर वनविभागाने ताब्यात घेतले.

याबाबत मिळालेल्या माहिती अशी, वारुंजी फाटा येथे तांबवे गावचे गुलाबराव पाटील यांचा लक्ष्मीकुंज बंगला आहे. परिसरात घुसीचे प्रमाण जास्त असल्याने मोकळ्या जागेत दोन पिंजरे ठेवण्यात आले होते. तेव्हा घूस पकडण्यासाठी पिंजऱ्यातून पहाटे मोठा आवाज येवू लागला. तेव्हा सबंधित घर मालकाने आज सकाळी पिंजरा पाहिला असता त्यामध्ये घूस ऐवजी वेगळाच प्राणी अडकल्याचे दिसून आले. यावेळी पिंजऱ्यात घुसीऐवजी वेगळाच प्राणी असल्याने लोकांनी पहाण्यासाठी गर्दी केली.

कराडचे नायब तहसिलदार राजेंद्र तांबे, प्राचार्य गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती सबंधित विभागाला दिली. वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनक्षेत्रपाल तुषार नवले व वनरक्षक रमेश जाधवर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदर पिंजर्‍यात उदमांजर (इंडियन स्मॉल सिव्हेट) अडकल्याचे दिसून आले. उपस्थित अधिकार्‍यांनी पंचनामा करुन उदमांजर ताब्यात घेत कराड पशुसंवर्धन रूग्णालयात डॉ. राहुल दडस यांच्याकडून त्याची तपासणी करण्यात आली.

दरम्यान सापडलेला सदर इंडियन स्मॉल सिव्हेट (उद मांजर) हा नर होता. तो सुस्थितीत असल्याने त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात अडचण नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तात्काळ वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक रमेश जाधवर, उत्तम पांढरे, चालक योगेश बेडेकर, वनमजुर भाऊसो नलवडे यांच्या उपस्थितीत त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले.

उदमाजरांची माहिती

लहान भारतीय सिव्हेट्स हे मांसाहारी (कीटकभक्षी) प्राणी आहेत जे प्रामुख्याने उंदीर, पक्षी, साप आणि कॅरियन यांना खातात. फळे आणि मुळे देखील खाऊ शकतात.  प्रजनन हंगाम वर्षभर असू शकतो तर इतर भागात तो हंगामी असतो. मादी सामान्यतः 2-5 पिल्लांना जन्म देतात .लहान भारतीय सिव्हेटसाठी मुख्य धोका शिकारिचा आहे. हे प्राणी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. लहान भारतीय सिव्हेट्सची त्यांची कातडी आणि ग्रंथी स्रावासाठी शिकार केली जाते ज्याला “सिव्हेट” कस्तुरी म्हणतात; हा घटक परफ्यूम, औषध आणि इतर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. ते घरगुती वापरासाठी, फसवणूक म्हणून वापरले जातात आणि शहरी आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव व्यापारात विकले जात असल्याची माहिती रोहन भाटे यांनी दिली.

Leave a Comment