ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने रोखल्यामुळे कारचालकाने थेट अंगावरच गाडी घातली अन्….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका कारचालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालत (dragged traffic cop) त्याला बोनेटवेरुन फरफटत नेले आहे. इंदोरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याने चालकाला मोबाइल फोनवर बोलत असल्याने रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या चालकाने गाडी थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच घातली (dragged traffic cop). या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे.

काय घडले नेमके?
वाहतूक पोलीस कर्मचारी शिव सिंग चौहान यांनी गाडी चालवताना मोबाइलवर बोलत असल्याने चालकाला थांबवलं होतं. दंड भरण्यास सांगण्यात आलं असता चालक संतापला आणि त्याने गाडी सुरू केली. यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने कारच्या बोनेटवर चढून कार चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने गाडी न थांबवता चार किमीपर्यंत त्याला फरफटत (dragged traffic cop) नेलं. पोलिसांनी चालकाला रोखण्यासाठी अखेर गाडीला घेरलं आणि त्याला ताब्यात घेतलं

यानंतर पोलिसांनी कार चालकाकडून पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त केली. आपल्याकडे या शस्त्रांचा परवाना असल्याचा चालकाने दावा केला असून त्यासंबंधित चौकशी सुरु आहे. आरोपीने जोरात ब्रेक दाबत अनेकदा आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न (dragged traffic cop) केला. तसंच अनेकदा इतर वाहनांच्या जवळ गाडी नेत मला इजा पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न होत असे पोलीस कर्मचारी शिव सिंग चौहान म्हणाले आहेत.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या