इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती विकायची अमली पदार्थ; एनसीबी ने ठोकल्या बेड्या

मुंबई | मुंबईमधील डोंगरी परिसरमधून मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने एका 22 वर्षीय मुलीला अटक केली आहे. ती इंस्टाग्राम वरून लोकांना अमली पदार्थ विकत असे. अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून दीड लाखाची रोकड आणि एम डी ड्रग्स जप्त केले आहे.

एन सी बी पथक अनेक दिवसापासून मुलीच्या अटकेसाठी प्रयत्न करत होते पण ती पळून जाण्यात यशस्वी होत होती. पोलिसांना नंतर खबर मिळाली की सदर मुलगी ही चींकु पठाण गँगमधील लोकांसोबत काम करत होती. तिचे नाव ईकरा कुरेशी असा असून ग्राहकांच्या मागणीनुसार ती एम डी, चरस, एल एस डी अश्या प्रकारचे ड्रग्स ग्राहकांना पुरवत असे. इंस्टाग्राम वरून ती नवीन ग्राहकांना संपर्क करायची. तिने ऑर्डर वाटप करण्यासाठी पाच महिलांना सोबत ठेवले होते. त्या महिला ड्रग्स पोहच करण्याचे काम करीत.

इकरा कुरेशिला माहिती होते की तिच्या फोनद्वारे तिला पकडले जाऊ शकते. त्यामुळे ती एका ऑर्डर साठी एकच फोन वापरायची. त्यानंतर नवीन फोन दुसऱ्या ऑर्डर साठी वापरण्यात येत होता. आपली पोलिसांना कोणी माहिती देत आहे असे समजताच ती आणि तिच्या गँग मधील व्यक्ती संबंधित लोकांना धमक्या देत होते. त्यांच्याविरोधात धमकी देण्याचेही अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत.

You might also like