पठ्ठ्यानं काकडीतून 29 गुंठ्यांत मिळवलं 3 लाख उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक शेतकरी कमी पैशात आणि कमी कालावधीत अशी काही पिके शेतीत घेऊन त्यातून बक्कळ पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. अशेच एक पीक औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याने घेत तब्बल 29 गुंठ्यात 3 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळवलं आहे.

आज कमी पाण्यात आणि कमी पैशात शेतकऱ्यांकडून नवीन सुधारित आणि प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर शेतीत केला जाऊ लागला आहे. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथील शेतकरी बंडू नारायण पडूळ यांनी देखील शासकीय योजनेचा लाभ घेत प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काकडी लागवडीतून चांगली कमाई केली आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात इतर पिके घेऊन त्यातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा त्यातून तुम्हाला नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल आणि त्यातून तुम्हीही स्वतः अनेक पिकांची माहिती घेत उत्तम शेती करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी Hello Krushi डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

जमिनीत शेडनेट

40 गुंठे शेत जमिनीत शेडनेटची उभारणी

बंडू पडूळ यांनी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देण्यासाठी शेडनेट हाऊसमध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थातच पोखरा योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेतला. या अनुदानातून त्यांनी आपल्या 40 गुंठे शेत जमिनीत शेडनेटची उभारणी केली. त्याच्या जोडीला त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सोलर पंप योजनेचा लाभ घेतला आहे.

capsicum

20 गुंठ्यात शिमला मिरचीची लागवड

पडूळ यांनी आपल्या चाळीस गुंठे शेत जमिनीत उभारलेल्या शेडनेट हाऊस मध्ये वीस गुंठ्यात काकडीची आणि वीस गुंठ्यात शिमला मिरचीची लागवड केली आहे. त्यांच्या काकडीला सध्या स्थितीत 28 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. असा दर जर कायम राहिला तर खर्च वजा जाता त्यांना तीन लाखांपर्यंत नफा केवळ काकडीतून मिळणार आहे. म्हणजेच अर्धा एकर शेत जमिनीतून तीन लाखांची त्यांना कमाई होणार आहे.

Cucumber Farming

काकडी शेतीतून दिला इतरांनाही रोजगार

शेतकरी बंडू पडूळ यांनी आपल्या शेतीतीतून इतरांनाही रोजगार दिला आहे. शेडनेट हाऊसची उभारणी करण्यासाठी महिलांची व शेतकऱ्यांची गरज भासते. त्यांनी आपल्या शेतात दहा ते बारा महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.

सोलर पंप

सोलर पंपाचा केला वापर

ग्रामीण भागात विजेच्या भारनियमनाचा प्रश्न वारंवार उमटत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना आपणि देता येत नाही. मात्र हुशार शेतकरी बंडू पडूळ यांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी सोलार पंप बसवला. त्यांनी पंपाद्वारे पाणी दिले. महाराष्ट्र शासनाच्या सोलार पंप योजने अंतर्गत बंडू पडूळ यांना 3 किलोवॅटचा पंप ज्याची बाजारात किंमत तीन ते साडेतीन लाख रुपये आहे. तो अवघ्या 16 हजारांत त्यांनी घेतला.