औरंगाबाद | शहरात गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना आपण ऐकत आहोत अशीच घटना एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहाटेच्या सुमारास घडली.
आग लागल्याची माहिती मिळताच सुरक्षारक्षकांनी तात्काळ अग्निशामक दलाला संपर्क केला. अग्निशामक दल आणि एमजीएम विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली
आग जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लागली होती. आग लागण्याच्या कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही मात्र आगीमुळे महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले.
सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही आणि अवघ्या अर्ध्या तासात ही आग अग्निशामक दलाने आटोक्यात आणली.