सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
बहे येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे फारणेवाडीच्या शेतकऱ्यांचा दहा एकर ऊस जळाला. आडसाली ऊसाचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी- दुपारी 1 च्या दरम्यान बहे येथील जाधव मळी भागात शॉर्टसर्किटमुळे स्पार्फकिंगने आग निर्माण झाली. क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले.
या आगीत पाच शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. संचित शिवाजी जाधव,श्रीकांत किरण जाधव,प्रकाश धोंडीराम जाधव,अरुण जनार्दन जाधव,आनंदा पांडुरंग मुळीक अशी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.घटनास्थळी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.
सतत येणारा महापूर व त्यानंतर हे आगीचे संकट यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी व ऊसाचे त्वरित गाळप व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांडून होते आहे.