औरंगाबाद : थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलला गंडवणारा भामटा आज वेदांतनगर पोलीसांनी जेरबंद केला आहे. औरंगाबादसह देशातील अनेक नामांकित हॉटेलला या भामट्याने गंडा घातला आहे. त्याने औरंगाबाद शहरातील रामा इंटरनॅशनल हॉटेल, अॅम्बेसिडर, लेमन ट्री या हॉटेलांना देखील या भामट्याने गंडा घातला आहे.
या भामट्याचे नाव भीमसेंट जॉन (वय.६५) तो मूळचा तामिळनाडू येथील असून. या आधी सुद्धा त्याने मुंबई, दिल्ली, हैदराबादसह देशातील विविध राज्यातील हॉटेलची फसवणूक आहे. तो महागड्या हॉटेल्समध्ये कॉन्फरन्स घेण्याच्या बहाण्याने राहून तेथील महागड्या सिगारेट, दारु पियुन नंतर पैसै न देता तेथून पाळुज जात असे आणि असे त्याने अनेक हॉटेल मध्ये केले. यावेळीही औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथील किज हॉटेलला तो गंडा घालणार होता मात्र किज हॉटेलच्या सतर्कते मुळे हा भामटा पकडल्या गेला.
हॉटेलमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल किजचे मालक चौधरी यांनी पोलिसांना कळविले. त्याने खोटे नाव सांगितले होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आधार क्रमांकावरून त्याची माहिती काढली. त्याच्या विरोधात कफ परेड येथील पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितले. पोलिसांनी जॉनला ताब्यात घेतले आहे. त्याला प्रथम २०१७ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अधिक माहिती अशी कि, जॉन तमिळनाडूत एका हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याचे ३७०० रूपये हॉटेलमालकाने बुडविले. हॉटेल मालकाने पगार बुडविल्यानंतर त्याने फसवणुकीचा धंदा सुरू केला असे त्याने पोलिसांना जबाब दिला.