Monday, January 30, 2023

रात्री मित्रांबरोबर केली दारूची पार्टी,सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या

- Advertisement -

बडोदा : वृत्तसंस्था – गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केली आहे. या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन करून माझ्यावर बलात्कार झाला असल्याचे सांगितले. 19 वर्षाच्या या तरुणीने आत्महत्या करण्याच्या आधल्या रात्री मित्रांबरोबर दारुची पार्टी केली होती. यानंतर तरुणीने मित्रांनी तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे.

हि तरुणी बडोद्यामधील लक्ष्मीपुरा या भागात राहत होती. या तरुणीने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली आहे. या तरुणीची तीन तरुणांबरोबर मैत्री झाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने आधल्या रात्री एका खोलीत तीन मित्रांबरोबर दारु प्यायली होती. यानंतर या तरुणीने तिच्या मित्रांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

या तरुणीने सकाळी तिच्या मित्राला फोन केला आणि संपूर्ण घटनेबाबत सांगितले. तसेच तिने आत्महत्या करण्याअगोदर या सर्वाचा व्हिडिओदेखिल तयार केला होता. यानंतर त्या तरुणीने आत्महत्या केली. हि 19 वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीमध्ये काम करत होती. तिच्या आईचे 6 महिन्यांपूर्वी निधन झाले होते. या तरुणीने घराच्या एका रूममध्ये दोन तरुण आणि एका तरुणीबरोबर दारुची पार्टी केली. या पार्टीमध्ये जास्त दारु प्यायल्यानंतर या तरुणीला प्रचंड नशा झाली होती. नशेमध्ये बुडालेल्या अवस्थेत तिचा गैरफायदा घेत दिशांत नावाच्या तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी दोघा जणांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.