मुंबईत झाली जंबो प्रॉपर्टी डील ! 1870000000 रुपयांना विकला गेला वरळीतील आलिशान फ्लॅट; कोणी खरेदी केला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशातील महत्वाच्या शहरांपैकी एक शहर म्हणजे मुंबई. अनेकांची स्वप्न पूर्ण करणारी मुंबई रिअल इस्टेटच्या बाबतीत सुद्धा अग्रेसर आहे. मुंबईत प्राईम लोकेशनवर असेल्या जागांचा भाव तर आवाक्याच्या बाहेरचा आहे. पण मुंबईतील वरळी परिसरात एक मोठी प्रॉपर्टी डील झाली आहे. दक्षिण मुंबईच्या प्राईम लोकेशनवर स्थित 15,000 चौरस फूटांचा एक आलिशान फ्लॅट तब्बल 187.47कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा फ्लॅट कोणत्या व्यक्तीने किंवा कंपनीने खरेदी केला हे जाणून घेऊया.

कुणी खरेदी केली प्रॉपर्टी ?

रिअल इस्टेट कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सने वरळी येथील सी फेस परिसरात स्थित या आलिशान अपार्टमेंटची विक्री केली आहे. या अपार्टमेंटचा एकूण क्षेत्रफळ अंदाजे 15,000 चौरस फूट आहे. या मोठ्या डीलमध्ये एसआर मेनन प्रॉपर्टीज एलएलपी ने करार केला आहे. ही भारतीय मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी) 2024 मध्ये स्थापन झाली होती, ज्याचे भागीदार राधिका नारंग परसराम आणि सुधीर विजय मेनन आहेत.

दक्षिण मुंबईतील लक्झरी प्रकल्प

हा प्रकल्प 1.5 एकर क्षेत्रात पसरलेला आहे, ज्यामध्ये एकूण 29 लक्झरी निवासी युनिट्स आहेत. यामध्ये 5 बीएचके आणि 6 बीएचके फ्लॅट्सचा समावेश आहे. अपार्टमेंटची कार्पेट एरिया 1,381.09 चौरस मीटर आहे आणि सात कार पार्किंग स्पॉट उपलब्ध आहेत.

स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क

या बाहुबली डीलमध्ये 11.25 कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. मुंबईतील प्रॉपर्टी बाजारातील या मोठ्या व्यवहाराने एक नवा टर्न घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांतील आलिशान घरांची खरेदी

मुंबईतील वरळी आणि आसपासच्या भागात गेल्या दोन वर्षात 4,000 कोटी रुपयांच्या आलिशान घरांची खरेदी झाली आहे. यामध्ये 400 कोटी रुपयांची मालमत्ता बॉलीवूड कलाकारांनी देखील खरेदी केली आहे. या उच्च किमतीच्या घरांची वाढती मागणी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील एक नविन ट्रेंड दर्शवते.
वरळीतील या मोठ्या प्रॉपर्टी डीलने मुंबईच्या आलिशान घरांच्या बाजारात एक नवा उचचांक गाठला आहे. यामुळे प्रॉपर्टी बाजारातील हलचालींवर नवीन चर्चा सुरू होईल.