चार वर्षीय बालकाचा पावसाचे पाणी साचलेल्या डबक्यात पडून मृत्यू ; आईसोबत गेला होता खुरपणीला

0
36
child death
child death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | चार वर्षीय चिमुकल्याचा शेतातील डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरापूर येथील शिवारातील शेतात हा चिमुकला आईसोबत गेला होता. खुरपणीसाठी गेलेल्या अर्चना नवनाथ नागरे यांच्या चार वर्षीय चिमुकल्याचा पावसाच्या पाण्याने साचलेल्या डबक्यात खेळत असताना बुडून मृत्यू झाला.

ही घटना बुधवार 30 जून रोजी सकाळी उघडकीस आली. कल्पेश नागरे (वय 4) वर्ष रा. लांजी ता. गंगापूर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

आई खुरपणी करत असताना कल्पेश बाजूला खेळत होता. यावेळी यावेळी तो डोक्यात पडला बराच वेळ होऊनही तो दिसत नसल्याने आईने त्याची शोधाशोध केली असता डबक्यात पडलेला दिसला. आजोबा एकनाथ कोंडेनी त्याला घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी कल्पेशला तपासून त्याला मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here