खंडाळा घाटात अर्धवट जळलेल्या अवस्थेत स्त्री जातीचा मृतदेह सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके 

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. सातारा जिल्ह्यातील पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा हद्दीत खंडाळा घाट येथे अर्धवट जळलेल्या अवस्थेत स्त्री जातीचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. याप्रकरणी खंडाळा पोलिसांनी अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा हद्दीत खंडाळा घाट येथे महामार्गाच्याकडेला नाल्यामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत स्त्री जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी दुपारी उघकीस आली. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. तसेच अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.

अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या स्त्री जातीच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरु होते. पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा हद्दीत खंडाळा घाट येथे गेल्या काही दिवसापासून बोगद्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी सोमवारी दुपारी स्त्री जातीचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांकडून मृतदेहाला ताब्यात घेत घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Leave a Comment