दोन कारचा भीषण अपघात; दोन जण ठार तर चार गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पैठणकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रॅक्टरमागे असलेल्या कार चालकानेही अचानक ब्रेक लावले. तोच भरधाव वेगात पाठीमागून येणारी कारसमोरील कारवर धडकून झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड-पैठण रस्त्यावर लिंबगाव (ता.पैठण) फाट्याजवळ काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात अनिल बाबासाहेब कोरडे व दत्ता निवृत्ती तांगडे (दोघे रा. दावरवाडी,ता.पैठण) असे ठार झालेल्यांची नावे आहे.

अधिक माहिती अशी, पैठण येथील राहूल माळवदे व त्यांचा मुलगा साई माळवदे हे कारने (एमएच 20 सीएस 7420) पाचोडकडून पैठणकडे जात असताना त्यांच्या पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने अचानक ट्रॅक्टरला ब्रेक लावल्याने माळवदे यांनी आपली कार ब्रेक केली. मात्र त्यांच्या कारमागे भरधाव वेगात येणारी कार (एमएच 20 बीवाय 9193) चालकाला समोरील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न आल्याने व अचानक वेगावर नियंत्रण करणे अशक्य झाल्याने समोरील कारला या कारने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे या कारमधील अनिल बाबासाहेब कोरडे व दत्ता निवृत्ती तांगडे हे दोघे जण जागीच ठार झाले, तर लतीब तांबोळी, सोमिनाथ दहीभाते यांच्यासह दोघे जणं गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा पुर्णतः चुराडा झाला झाला.

या अपघाताप्रसंगी पैठणकडे पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक फेरोझ बरडे व त्यांचे सहकारी जात होते. त्यांनी थांबून पाचोड पोलिसोना माहिती दिली. तसेच अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक नागरिकांसह परिसरातील शेकडो नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील गर्दी व वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेऊन पाचोड पोलिस ठाण्यांचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, विलास काकडे, प्रशांत नांदवे, रविद्र आंबेकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतुक सुरळीत केली व ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर घुगे यांनी उपरोक्त दोघास तपासून मृत घोषित केले, तर चौघांवर प्रथोमोपचार करून त्यांना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकिय रूग्णालयात (घाटी) पाठविले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यांत नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे करीत आहेत

Leave a Comment