औरंगाबाद -अहमदनगर रस्त्यावर गोदामाला लागली भीषण आग

रबराचे गोदाम जळून खाक,  लाखो रुपयांचे नुकसान

औरंगाबाद : वाळूज महानगराजवळील औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यालगत असलेल्या रबराच्या गोदामाला रविवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली.  या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  या भीषण आगीने परिसरात खळबळ उडाली असून आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. यावेळी रस्त्यावर आगीचे लोळ

या बाबत माहिती अशी की, रविवारी सायंकाळी रस्त्यालगत असलेल्या रबराच्या .गोदामाला सायंकाळी अचानक आग लागली. यावेळी रस्त्यावर सर्वत्र आगीचे लोळ पसरले होते. विशेष म्हणजे या रस्त्यालगत जवळच पेट्रोलपंप असल्याने मोठा अनर्थ होतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र अग्नीशामक दलाच्या गाड्या वेळेवर पोहचल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत मोठी मदत झाल्याने मोठी दुर्घटना टळली .

यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी यावेळी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून परिसरात खळबळ उडाली आहे.  या वेळी बघ्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

You might also like