दर्शनी भागावर रंगरंगोटी; पाठीमागे मात्र फुटाफुटी कचऱ्याचे साम्राज्य…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृति सदन म्हणजेच टाऊन हॉल सध्या विविध समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. कारण टाऊन हॉलच्या समोरील भागावर रंगरंगोटी तर पाठीमागे सर्वत्र फुटाफुटी पालापाचोळा कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

कराड शहरासह तालुक्यातील बहुसंख्य लोक कराडच्या टाऊन हॉलला भेट देत असतात. कराडच्या विद्यानगरीतील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी क्षणभर विश्रांतीसाठी तसेच अभ्यासासाठी येत असतात. स्वच्छ सुंदर कराड पाहण्यासाठी येणाऱ्या या लोकांना विविध समस्यांना सध्या सामोरे जावे लागत आहे.

Karad town hall

कारण कराडच्या टाऊनहॉलमधील झाडे पाण्याअभावी वाळली आहेत तर टाऊनहॉल परिसरात तयार करण्यात आलेल्या छोट्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गवत उगवले आहे. या ठिकाणी बसवण्यात आलेल्या लोन तसेच लाईटचीही दुरावस्था झालेली आहे. यामुळे येथे सावलीत विश्रांती घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना धड जागाच बसायला मिळत नाही.

Karad town hall

विशेष म्हणजे टाऊन हॉलमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर तेथील निघालेला कचरा कसाही अस्ताव्यस्त टाकण्यात आलेला आहे. याची दुर्गंधीही या ठिकाणी पसरली आहे. टाऊन हॉलच्या या दुरावस्थेकडे कराड नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून एवढ्या चांगल्या अनमोल ठेव्याचे व्यवस्थित जतन केले जात नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.