थोडासा दिलासा : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 878 पाॅझिटीव्ह तर 31 बाधितांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 878 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील उंच्चाकी 3 हजार 124 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

शुक्रवारी दिवसभरात घरी सोडण्यात आलेल्या उंच्चाकी 3 हजार 124 कोरोनामुक्तमुळे काही प्रमाणात जिल्ह्याचा रेट चांगला झाला आहे. तर बाधितही थोड्या प्रमाणात मृत्यूचा आकडा कमी आला आहे. कोरोनामुक्त आणि कोरोना बाधित यांच्यामध्ये जास्त नाही परंतु थोड्या प्रमाणात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण जास्त असल्याने जिल्ह्याला थोडासा दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 588 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 44 हजार 843 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 23  हजार 770 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3359 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 31 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Leave a Comment