महाराष्ट्रात सुदैवाने मोठा रेल्वे अपघात टळला ; कुठे घडली घटना ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशभरात रेल्वे अपघातांच्या अनेक घटना मागच्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातूनही आणखी एक बातमी समोर येते आहे. रेल्वेच्या रुळावर सिमेंटचे पोल आणि दगड ठेवल्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात झाला असता मात्र सुदैवाने अपघात टळला. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लाडगाव- करमाड या भागात घटना घडली.

नक्की काय झाले?

ठरलेल्या वेळाप्रमाणे नंदिग्राम एक्सप्रेस रात्री संभाजीनगर येथून जालन्याकडे रवाना झाली. ही एक्सप्रेस रात्री एक वाजता लाडगाव- करमाळा या भागातील उड्डाण पुलाखालून जात असताना चालकाला रुळावर सिमेंटचे पोल आणि दगड ठेवल्याचे निदर्शनास आले. यावेळी रेल्वेचा स्पीड देखील 100 किलोमीटर प्रतितास असल्यामुळे ब्रेक लागेपर्यंत रेल्वेने दगडांना उडवलं यावेळी जोरदार आवाज झाल्यामुळे प्रवाशांच्या मध्ये घबराहट निर्माण झाली.
त्यानंतर दगड ठेवलेल्या जागेपासून 200 मीटर वर जाऊन ही रेल्वे थांबली. धडकेमुळे रेल्वे रुळावर आणि आजूबाजूला सिमेंटच्या दगडांचे तुकडे पडले होते याबाबत नियंत्रण कशाला माहिती दिल्यानंतर रेल्वे पुढे रवाना झाली.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, एसडीपीओ विष्णू भोई यांच्यासह करमण पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी रेल्वेचे वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर कैलास दास यांनी दिलेल्या फिर्यादीवर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास केला जात आहे.