हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | झारखंडमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आलेली आहे. ही बातमी वाचल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. झारखंडमध्ये एका व्यक्तीला काम करत असताना साप चावला. त्यानंतर त्या चिडलेल्या व्यक्तीने त्या सापाला पकडून त्याला तीन वेळा चावले. त्यामुळे या बातमीचा खूपच हाहाकार झालेला आहे. मजुराने तीन वेळा त्या सापाला चावल्याने तो साप मेला आहे. परंतु तो मजूर वाचलेला आहे. त्यामुळे नक्की विषारी कोण होते?असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे.
झारखंडमधील संतोष लोहारसोबत हा प्रकार घडलेला आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहे. आणि त्याची प्रकृती ही आता चांगली आहे. संतोष हा रेल्वे प्रकल्पामध्ये खोदकाम करत होता. जंगलाच्या भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू होते. खोदकाम करताना एका सापाने त्याला एकदा दंश केला, तरीही तो खोदतच राहिला. त्यामुळे सापाने त्याला दुसऱ्यांदा दंश केला. रागवलेल्या संतोषने त्या सापाला पकडले आणि तीन ठिकाणी चावा घेतला.
त्या सापाला पकडण्यासाठी त्यांनी लोखंडी सळीचा वापर केला होता. परंतु संतोषने त्याचा चावा घेतल्यानंतर साप जागेवरच मेला. संतोषने ही घटना आधी ऐकली असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, मी गावातील लोकांकडून ऐकले आहे. जर तुम्हाला सापाने एकदा दंश केलं तर तुम्ही त्याला दोनदा चावा. त्यांनी जर तो दोनदा चावला तर त्याला तीनदा चावा. असे केल्याने विषयाचा परिणाम तुमच्यावर होत नाही.
संतोषने हीच आयडिया वापरून त्या सापाला तीन वेळा चावल. तो साप जागीच ठार झाला. परंतु सुदैवाने संतोषचा जीव वाचला. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. आणि त्याची प्रकृती देखील धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले आहे.