औरंगाबाद । स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात आलेल्या उच्चशिक्षीत तरुणीला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्यावर तिच्यावर सतत तीन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाकीर कासीम शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुध्द तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह््यातील तरुणीचे कला शाखेच्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण झालेले आहे. तिच्या वडीलांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले असून, घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. ही तरुणी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी मैत्रिणींसोबत हडको, टिव्ही सेंटर भागात खोली घेऊन राहते.
सन २०१७ मध्ये ओळखीच्या शेख शाकीर याच्यासोबत तिची मैत्री झाली. दोघेही जालना जिल्ह््यातील असल्याने तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसला. शाकीरने तिला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण डिफेन्स करीअर अॅकॅडमीमध्ये असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शाकीर याचा मैदानी सराव चांगला असेल म्हणून दोघेही पोलिस अधीक्षक कार्यालयामागील गोकुळ स्टेडीयमवर सरावासाठी जाऊ लागले.
त्यावेळी शाकीर हा तिच्याशी अंगलगट करु लागला. मात्र, तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले. याच काळात आॅक्टोबर महिन्यात गावावरुन आल्यावर शाकीरने तिला प्रेमसंबंध ठेवण्याबाबत विचारणा केली. त्यावर तरुणीने त्याला नकार दिला. त्याचवेळी त्याने मी जिवाचे बरेवाईट करून घेईन, त्याचा तुला त्रास होईल असे म्हणत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्या मरणाची भिती वाटू लागल्याने तरुणीने त्याला प्रेमसंबंध ठेवण्याबाबत होकार दिला. पुढे त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत मैत्रिणींसोबत राहणारी खोली सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघेही टिव्ही सेंटर भागातील साई मंदीराजवळ असलेल्या खोलीत राहण्यासाठी गेले. यावेळी भाड्याने खोली घेताना त्याने स्वत:चे नाव शेखर जाधव असल्याचे सांगितले. याशिवाय दोघेही पती-पत्नी असल्याचे सांगून भाड्याने खोली घेतली. यानंतरही शाकीरने जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देत तिच्यासोबत वारंवार शारीरीक संबंध ठेवले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’