जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांची मिनी बस उभ्या कंटेनरला धडकली; 11 जण जखमी

औरंगाबाद | जेजुरीहून नागपूर कडे जाणाऱ्या भाविकांची मिनीबस रस्त्यावर उभ्या नादुरुस्त कंटेनरला धडकली या भीषण अपघातात बसचा अक्षरशः चुराडा झाला असून 11जण जखमी झाले असून त्यातील तिघे गंभीर आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.ही घटना आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास औरंगाबाद-अहेमदनगर महामार्गावरील लिंबे जळगाव येथे घडला.जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हर्षदा ठाकरे वय- 10 वर्ष, बंडूजी ठाकरे वय- 41वर्ष, रामभाऊ ठाकरे वय- 75वर्ष, स्नेहा गावंडे वय- 30वर्ष ,अश्विन गावंडे वय-40वर्ष, माधव गावंडे वय-50 वर्ष, विकास म्हस्के वय- 50 वर्ष (सर्व राहणार जि. नागपूर) अशी घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे आहेत तर उर्वरित किरकोळ जखमी झाले आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, (एम.एच.49 जे 0634) या क्रमांकाच्या मिनी बस मधून नागपूर येथील बारा जण जेजुरी येथे गेले होते.तेथून ते परत घरी नागपूर कडे जात असताना औरंगाबाद-अहेमदनगर महामार्गावरील लिंबे जळगाव येथे नादुरुस्त मालवाहू कंटेनर रस्त्यात उभा होता. पहाटेची वेळ होती.उभ्या कंटेनर ला रिफ्लेकटर किंव कंटेनर नादुरुस्त असल्याचा काहीच इशारदर्शक फलक,वस्तू लावण्यात आली न्हवती दरम्यान वेगात असलेल्या मिनी बस चालकाला अंदाज न आल्याने भरधाव बस त्या कंटेनारला धडकुन भीषण अपघात घडला.व बसचा चुराडा होऊन कंटेनर मध्ये घुसली.ही बाब सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांना कळताच त्यांनी त्यांच्या मित्राच्या साहाय्याने बस मध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णल्यात हलविले. सुदैवाने या भीषण अपघात जीवित हानी झाली नाही.सर्व जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like