प्रेमात अडसर ठरणाऱ्या महिलेचा अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंडच्या मदतीने केला खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
औरंगाबाद – प्रेमात अडथळा ठरणाऱ्या महिलेचा एका अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंड अल्पवयीन मैत्रिण आणि मित्राच्या मदतीने बाळापुर शिवारातील शेतात बोलून घेऊन गळा चिरून खून केल्याची घटना काल उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत या खुनाचा उलगडा करत मारेकरी बॉयफ्रेंड व त्याच्या मित्रास अटक केली. तर दोन विधिसंघर्षग्रस्त मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या घटनेमुळे मुकुंदवाडी परिसर हादरून गेला आहे. सुशीला संजय पवार (39, रा. अंबिकानडर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी दीपक राजू भताडे (24, रा. शिवाजीनगर) त्याचा मित्र सुनील उर्फ राहुल संजय महेर (19, रा. चिकलठाणा) तसेच 17 वर्षाच्या आणि 12 वर्षाच्या विधिसंघर्षग्रस्त मुलींचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, सुशीला यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. शिवाजीनगर आतील जलकुंभ जवळ सुशीला भाजीपाला विक्री करीत असत. रविवारी रात्री 11 वाजता त्यांना 17 वर्षाच्या मुलीने फोन करून बाळापूर शिवारात बोलून घेतले. तेथे सुशीला दुचाकीवरून गेल्यानंतर मुख्य आरोपी दीपक याने 17 वर्षाच्या मुली सोबतच्या प्रेमात तुम्ही अडथळा निर्माण करु नका असे सांगितले त्यावरून वाद सुरू झाला.
त्यानंतर 12 वर्षाच्या मुलीने सुशील यांचे केस पकडले, सुनीलने एक हात पकडला. सतरा वर्षाच्या मुलीने दुसरा हात पकडला. दिपकने सुशीला यांच्या मानेवर चाकूने आठ वार केले. यामुळे जागीच गतप्राण झाल्या. त्यानंतर सुशीला ची गाडी घेऊन चौघे निघून गेले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक भताडे याचे 17 वर्षाच्या मुलीसोबत काही वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. या दीपकच्या मदतीला त्याचा मित्र सुनील आला. तर 17 वर्षाच्या मुलीच्या मदतीला त्याची 12 वर्षाची मैत्रीण आल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Leave a Comment