Monday, February 6, 2023

जिवे मारण्याची धमकी देत सैन्य दलातील शिपायाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

- Advertisement -

औरंगाबाद : माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सैन्य दलातील एका शिपायाने बलात्कार केल्याची घटना 2 जुलैला हॉटेल नंद्राबादनजीक क्रिस्टॉल या ठिकाणी घडली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मनोज संजय सतूके, वय 21, (रा,दहेगाव .ता कन्नड) हा सैन्य दलात शिपाई आहे. तो सध्या राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील नसिराबाद येथे कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी तो दोन महिन्यांच्या सुट्टीवर आला होता. त्या दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून औरंगाबाद जवाहर कॉलनीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली त्यानंतर मोबाईल नंबर मिळवला. मला तु खुप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. असे बोलून 2 जुलै रोजी खुलताबाद जवळीक नंद्राबादनजीक क्रिस्टॉल हॉटेलमध्ये आरोपीने मुलीला बोलवून घेतले. त्यानंतर या हॉटेलमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोघांनी जेवण केले.

- Advertisement -

यानंतर मनोज तिला बळजबरीने एका रूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी कोणाला सांगितले तर तूला मारून टाकेल अशी धमकी दिली. व बाबा पेट्रोल पंपावर आणून सोडले. घरी आल्यावर घडलेला प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितला. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात आरोपीविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत मानकर हे करत आहेत.