हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कॉफी पिणे हे सर्वांनाच आवडते. आपल्या देशात जितके चहा लवर्स आहेत तितकेच कॉफी लवर्स देखील आहेत. त्यामुळे चहासोबत भारतात कॉफीची दुकाने देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. मात्र अशाच एका दुकानाला कॉफी विकणे महागात पडले आहे. कारण की आता या दुकानाच्या मालकाला कॉफीच्या बदल्यात एका महिलेला तब्बल 24 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? आपण जाणून घेऊयात.
2021 साली एक 70 वर्षीय महिला जॉर्जियातील डंकिन आउटलेटमध्ये कॉफी पिण्यासाठी गेली होती. या दुकानात तिने हॉट कॉफीची ऑर्डर दिली होती. मात्र ही हॉट कॉफी आणताना कर्मचाऱ्याकडून मोठी चूक झाली. कॉफीच्या कपाचे झाकण मोकळे असल्यामुळे या कर्मचाऱ्याकडून हॉट कॉपी थेट महिलेच्या पायावर सांडली. यामुळे ती चांगलीच भाजून निघाली. यानंतर कर्मचाऱ्याने महिलेची माफी देखील मागितली. परंतु या महिलेने दुकानाच्या मालकाला थेट कोर्टात खेचले. या प्रकरणाच्या सुनावणीत कोर्टाने दुकानदाराला नुकसान भरपाई म्हणून महिलेला 3 मिलियन डॉलर्स दंड म्हणजे 25 कोटी रुपये देण्यास सांगितले आहे.
कोर्टाच्या युक्तीवादात महिलेने म्हटले की, हॉट कॉफी आणताना दुकानदारातील कर्मचाऱ्यांचे आपल्या कामाकडे लक्ष नव्हते त्याने कॉफीच्या कपाचे झाकण तसेच उघडे ठेवले होते ज्यामुळे ती कॉफी माझ्या मांडीवर कमरेवर आणि पोटावर सांडली परिणामी मला दोन आणि तीन डिग्रीच्या बर्न्स झाले. या जखमा इतक्या खोलवर गेल्या होत्या की, उपचारासाठी बराच काळ घालवावा लागला. तसेच त्याचे सर्व पैसे मलाच भरावे लागले. या महिलेची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने दुकानदाराला दोषी ठरवत नुकसान भरपाई म्हणून महिलेला 24 कोटी 97 लाख 20 हजार रुपये देण्यास सांगितले आहे.