रात्रपाळीस कामावर गेलेली आई मुलासह बेपत्ता

0
152
Police Borgaon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीस कामावर जाते म्हणून घरातून गेलेली महिला व तिचा 3 वर्षाचा मुलगा घरी परत न आल्याने ते दोघे बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मनीषा भरत जाधव (वय- 22 वर्षे, रा. नागठाणे) व तिचा मुलगा आदर्श भरत जाधव असे दोघा माय- लेकांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद भरत पोपट जाधव (मूळ रा. निनाम, सध्या रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही नागठाणे येथे तिच्या पतीसह वास्तव्यास आहे. तिचे पती हे शेतीच्या कामासाठी त्यांच्या मूळगावी निनाम येथे गेले होते. सोमवारी सायंकाळी 7 वाजता ही महिला तिच्या लहान मुलासह हॉस्पिटल मध्ये रात्र पाळीस कामावर जाते म्हणून घरातून गेली. दुसऱ्या दिवशी त्यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांची पत्नी व मुलगा घरी दिसून आला नाही.

भरत जाधव यांनी पत्नी व मुलाचा सर्वत्र शोध घेतला तरी त्यांना ते मिळून आले नाहीत. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बोरगाव पोलिस आई व मुलाचा शोध घेत आहेत.