महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 16 मार्च 2025 पासून मुंबई आणि गोव्याच्या दरम्यान एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. हा निर्णय मध्य रेल्वे कडून घेण्यात आला आहे, ज्यामुळे होळी सणाच्या निमित्ताने मुंबई आणि गोव्याच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होईल.
काय असेल वेळापत्रक ?
ही विशेष गाडी मुंबईहून एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) ते मडगाव पर्यंत चालवली जाणार आहे. विशेष गाडी क्रमांक 01103, 17 आणि 24 मार्च रोजी सकाळी 8:20 वाजता एलटीटी येथून सुटेल आणि रात्री 9:40 वाजता मडगाव पोहोचेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 01104 16 आणि 23 मार्च रोजी मडगाव येथून दुपारी 4:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:25 वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल.
या स्थानकांवर थांबणार
ही नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. म्हणजेच, मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होईल, आणि होळी सणाच्या पूर्वी एक महत्त्वपूर्ण सोयीची रेल्वे सेवा सुरू होईल.