जिल्हा रुग्णालयातून एका दिवसाचे बाळ चोरीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना – शहरातील गांधी चमन येथील जिल्हा स्त्री व बाल रूग्णालयातून आज सकाळी एक दिवसांचे बाळ एका महिलेने लंपास केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सीसीटीव्ह फुटेजची तपासणी करून शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेनंतर रूग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्न चिन्हं निर्माण झाले आहे.

जालना तालुक्यातील पारेगाव येथील रूकसाना अहमद शेख ही महिल प्रस्तृतीसाठी रविवारी रात्री दाखल झाली होती. रविवारी रात्री सहा वाजेच्या सुमारास या महिलेने एका मुलाला जन्म दिली. सोमवारी सकाळी रूकसाना शेख यांच्या नातेवाईक महिलेने रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीका यांना न विचारता बाळाला सकाळच्या कवळ्या उन्हात घेऊन गेल्या. दरम्यान या परिसरात रात्रीपासून फिरणाऱ्या एका महिलेकडे बाळाला देऊन त्या इतर कामात व्यस्त झाल्या. याचा फायदा घेऊन या संबंधित अनोखळी महिला हे एक दिवसांचे बाळ घेऊन पसार झाली. बाळ चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात शोधाशोध सुरू केले. तसेच या प्रकरणाची माहिती कदीम जालना पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळाल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी जिल्हा स्त्री व बाल रूग्णालयात धाव घेत रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या बाळाला घेऊन जणारी महिला पोलिसांना दिसून आले असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave a Comment