उत्तम नेतृत्वक्षमता असलेला व्यक्तीमध्ये असतात ही कौशल्ये…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लाईफस्टाईल फंडा । नेतृत्व हे व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. जे कार्यक्षमता वाढविण्यात आणि संघटनात्मक उद्दीष्टे साध्य करण्यात मदत करते. एक चांगला नेता पुढाकार घेत असतो.  चांगल्या नेत्यामध्ये  धैर्य असते आणि यशस्वी होण्याची महत्वाकांक्षा असते. एक चांगला नेता संघास त्यांच्या इष्टतम कामगिरीसाठी नेहमी प्रोत्साहित करतो आणि संघटनात्मक यश मिळवतो. खालील मुद्दे उत्तम नेतृत्त्वा क्षमता असलेल्या  व्यक्ती मध्ये असतात व तो या गोष्टींना नेहमी प्राध्यान देण्याचा प्रयन्त करीत असतो.

१] स्वतःच्या कृतीने आरंभ करतो – नेता अशी व्यक्ती आहे जी प्रथम कार्य सुरू करते. असेल त्या परिस्थितीमध्ये  योग्य धोरण व योजनांची अंमलबजावणी करुन कार्य सुरू करतो.

२] प्रेरणा देणे –  चिंतेच्या किंव्हा संकटाच्या वेळी  प्रेरणादायी भूमिका तो निभवत असतो. तो कर्मचार्‍यांना त्यांच्या आर्थिक पडघडीमध्ये सुद्धा धीर देतो.

३] मार्गदर्शन प्रदान करतो – नेत्याला केवळ पर्यवेक्षण करणेच एवढेच काम नसते तर वेळोवेळी सहकाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून भूमिका स्वीकारावी लागते.  येथे मार्गदर्शन म्हणजे सहकार्यांसाठी  त्यांचे कार्य प्रभावी आणि कार्यक्षमतेने कसे करावे हे सुचविणे होय.

४] आत्मविश्वास निर्माण करतो  – नेतृत्व करतांना आत्मविश्वास हा एक महत्वाचा घटक आहे.  जो सहकार्यांसाठी कामाच्या प्रयत्नांची अभिव्यक्ती करून, त्यांची भूमिका  स्पष्ट करुन आणि ध्येय प्रभावीपणे साध्य करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देत असतो. या मध्ये कर्मचार्‍यांच्या तक्रारी आणि समस्यांबद्दल ऐकणे देखील महत्वाचे आहे व त्यावर तोडगा काढून त्यांच्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण करणे.

५] सहकाऱ्यांचे मनोबल वाढवितो  – एक नेता  सहकार्यांना प्रत्येक टप्प्यात  पूर्ण सहकार्य करून त्यांचे  मनोबल वाढवणारा असू शकतो, जेणेकरुन आपलेच सहकारी उद्धिष्ट साध्य करण्यासाठी योग्य पणे कार्य करतात. तेव्हा  मात्र त्यां  सहकार्यांनी त्यांच्या उत्कृष्ट क्षमतेसह ती कामगिरी केलेली असते. .

६] कामाचे वातावरण निर्माण करतो  –  नेता (म्हणजे जो नेतृत्व करतो तो) जो लोकांकडून योग्य व्यवस्थापन करून लक्षित गोष्टी साध्य करीत असतो.  कार्यक्षम कार्य वातावरण निर्माण करण्यासाठी नेता आपल्या सहकार्यांना योग्य मदत केरतो. म्हणून, मानवी संबंध नेता नेहमी लक्षात ठेवित असतो.

७] योग्य समन्वय साधणारा असतो –  संघटनात्मक पातळीवर सर्वांशी योग्य समन्वय साधून संघर्ष, प्रतिस्पर्धा, , विलंब आणि इतर संस्थात्मक समस्या कमी करण्यात मदत करतो. यामुळे संस्थेचे कामकाज सुरळीत राहते. म्हणूनच, समन्वयाच्या मदतीने एखादी संस्था सहज व जलद गतीने आपली उद्दीष्टे साध्य करू शकते.



 

Leave a Comment