Satara News : कराडात पोलिसांच्या बाप्पांचे झाले विसर्जन; फुगड्या अन् ढोल ताशांच्या गजरात ‘खाकी’ ही नाचली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेशोत्सवातील अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत पोलीस बांधवांनी कायदा-सुव्यवस्थेचे कर्तव्य पार पाडले अन् दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) रात्री पारंपारिक वाद्यांच्या गजरात कराड शहर पोलीस स्टेशनच्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. बंदोबस्ताचा थकवा विसरून लाडक्या गणरायाला निरोप देताना खाकी वर्दीतील माणसं सुद्धा देहभान हरपून नाचली.

कराड शहर पोलीस ठाण्यात दरवर्षी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. परंपरेनुसार यंदाही पोलीस बांधवांनी गणेशोत्सव साजरा केला. परंतु, यंदा पोलिसांवर कायदा-सुवस्थेचा मोठा ताण होता. तणावाच्या परिस्थितीत पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले. बंदोबस्तामुळे अनंत चतुर्दशीदिवशी गणरायाचे विसर्जन त्यांना करता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) पोलीस बांधवांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला.

 

पारंपारिक वाद्यांवर पोलिसांचा ठेका

गणरायाला निरोप देताना पोलीस बांधव पारंपरिक वाद्यांच्या तालावर थिरकले. यानिमित्ताने कराडच्या बाजारपेठ खाकी वर्दीचा जल्लोष पाहायला मिळाला. पोलीस हा देखील माणूसच असतो. त्यांनाही सणवार असताण. मात्र कायदा-सुव्यवस्था राखण्यास ते प्राधान्य देतात. कर्तव्य पार पाडल्यानंतर खाकी वर्दीतला माणूस उरतो. त्याचेच कराडकरांना आज दर्शन घडले.

महिला पोलिसांनी वेधले लक्ष

गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पोलिसांचा एकसारखा वेश लक्ष वेधून घेत होता. सर्व महिला पोलिसांनी फेटे बांधले होते. पारंपारिक वाद्यांवर महिला पोलिसांचा जल्लोष रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेल्या नागरिकांनी पोलीस बांधवांना चीअरअप केले.